ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

चीनची लडाखमध्ये घुसखोरी! “स्थानिकांच्या जमिनीही बळकावल्या”, राहुल गांधींचा दावा

नवी दिल्ली : (Rahul Gandhi On Narendra Modi) काँग्रेसचे नेते अन् खासदार राहुल गांधी सध्या लडाख दौऱ्यावर आहेत. पँगॉन्ग लेकवर राहुल गांधी यांनी त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. तसंच आयोजित केलेल्या प्रार्थना सभेला राहुल यांनी हजेरी लावली.

यावेळी माध्यमाशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, मला इथल्या लोकांनी सांगितलं, चीनचं सैन्य भारतीय सीमेत घुसलं आहे. दुसऱ्या बाजूला आपलं सरकार आणि आपले पंतप्रधान दावा करत आहेत की आपली एक इंचही जमीन गेलेली नाही. इथले लोक त्यांच्या गायी-म्हशींना ज्या ठिकाणी चरण्यासाठी घेऊन जात होते ती जमीन (चरई क्षेत्र) चीनने बळकावली आहे.

लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. परंतु, जनतेचं गाऱ्हाणं सरकार ऐकत नाही, आम्ही ते ऐकून घेऊ. यावेळी राहुल गांधी यांनी त्यांचे वडील दिवंगत राजीव गांधी यांचं स्मरण केलं. ते म्हणाले, माझे वडील हे माझ्या महान शिक्षकांपैकी एक होते. भारत जोडो यात्रेदरम्यान, मला लडाखला जायचं होतं, परंतु, काही कारणास्तव ते शक्य झालं नाही. त्यामुळे मी आत्ता इथे आलो आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले, लडाखमधील नागरिकांच्या सरकारविरोधात अनेक तक्रारी आहेत. त्यांना दिलेल्या दर्जामुळे ते खूश नाहीत. लडाखच्या जनतेला प्रतिनिधित्व हवं आहे. त्यांना वाटतं की त्यांचा हा प्रदेश नोकरशाहांनी नव्हे तर जनतेने चालवावा, त्यांच्या प्रतिनिधिंनी चालवावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये