कुणीतरी येणार गं! राहुल वैद्य-दिशा परमार होणार आई बाबा, शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

मुंबई | Rahul Vaidya And Disha Parmar – राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि दिशा परमार (Disha Parmar) ही जोडी चांगलीच लोकप्रिय आहे. त्यांचे चाहतेही लाखोंच्या संख्येत आहेत. ते दोघं सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. ते त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अशातच आता राहुल आणि दिशानं चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. लवकरच ते दोघं आई बाबा होणार आहेत. याबाबतची एक पोस्ट त्या दोघांनी शेअर केली आहे.
राहुल आणि दिशानं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहे. या फोटोंमध्ये दिशा तिचा बेबी बंप दाखवताना दिसत आहे. तसंच त्या दोघांनी सोनोग्राफीचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी त्यांच्या बाळाची पहिली झलक दाखवली आहे.
राहुल-दिशानं शेअर केलेल्या फोटोत राहुलच्या हातात ‘आई- बाबा’ लिहिलेली पाटी पाहायला मिळत आहे. तसंच यावेळी त्या दोघांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याचं दिसत आहे. सोबतच “लवकरच होणारे आई-बाबा आणि बाळाकडून तुम्हाला नमस्कार”, असं कॅप्शनही त्या दोघांनी या फोटोला दिलं आहे.
राहुल आणि दिशानं ही गूडन्यूज शेअर करताच अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी त्यांच्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसंच त्यांनी शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओला चाहते मोठ्या प्रमाणात लाईक करताना दिसत आहेत.