ताज्या बातम्यादेश - विदेश

मिझोराममध्ये रेल्वे पूल कोसळला; 17 मजुरांचा मृत्यू, 30 ते 40 मजूर ढिगाऱ्याखाली

आयझॉल | Mizoram Bridge Collapse – मिझोरामची (Mizoram) राजधानी आयझॉलजवळ (Aizawl) बांधकामाधीन रेल्वे पूल कोसळला. या अपघातात 17 मजुरांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली अजूनही 30 ते 40 मजूर अडकल्याचा अंदाज आहे. या मजुरांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. सायरंगमध्ये सकाळी 10 वाजता हा अपघात झाला.

समोर आलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी पुलावर 35 ते 40 मजूर काम करत होते. बैराबी ते सायरंग जोडणाऱ्या कुरुंग नदीवर हा पूल बांधला जात होता. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. ​​​​​​मिझोरमचे मुख्यमंत्री जोराम थांगा यांनी अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रशासन मदत कार्य करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच जखमींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

तिसऱ्या आणि चौथ्या पिलरमधील गर्डर 341 फूट खाली कोसळला, पुलामध्ये एकूण चार पिलर आहेत. व्हिडीओमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या पिलरमधील गर्डर तुटल्याने खाली पडल्याचे दिसत आहे. सर्व मजूर याच गर्डरवर काम करत होते. जमिनीपासून पुलाची उंची 341 फूट आहे. म्हणजे हा पूल कुतूबमिनारापेक्षाही उंच आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये