अर्थताज्या बातम्याशेत -शिवार

परतीच्या पावसाचा बीड जिल्ह्यात धुमाकूळ, शेती पिकांचं मोठं नुकसान; शेतकरी चिंताग्रस्त! 

बीड : (Rains in Beed district damage to agricultural crops) राज्यात परतीच्या पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. बीड (Beed) जिल्ह्यासह मराठवाड्यात हातातोंडाला आलेल्या पिकाचे पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, बळीराजासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. यामुळे शेतकरी (Former) मेटाकुटीला आला आहे.

बीड जिल्ह्यात सध्या परतीच्या पावसानं थैमान घातलं आहे. नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. या पावसामुळं सोयाबीन आणि कापसाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. रात्रीपासून माजलगाव, (Majalgaon) वडवणी (Wadwani) तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं काढून ठेवलेलं सोयाबीन पाण्यात गेलं आहे. तर कापसाच्या शेतात देखील पाणी साचल्यानं कापसाच मोठं नुकसान होत आहे.

यावर्षी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस (Cotton) आणि सोयाबीन (Soybeans) पिकाचं क्षेत्र वाढला असून, परतीच्या पावसाचा या पिकांना मोठा फटका बसत आहे. अनेक शेतकऱ्यांनी काढून ठेवलेलं सोयाबीन पाण्यात वाहून जात आहे. तर दुसरीकडे कापूस वेचनीला आला आसून सतत पडणाऱ्या पावसामुळं झाडे काळवंडून जात असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. सरकार (Government) आणि प्रशासनाचे (Administration) याकडे अद्याप दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा कोणी वाली आहे की, नाही? असा प्रश्न सध्या यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये