शिंदे-ठाकरेंच्या मनात काय? शिंदेंच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा नागपुरातला मुक्काम वाढला!

नागपूर : (Raj Thackeray Meet Eknath Shinde) पाच महिन्यापुर्वी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेशी बंडखेरी केली, तेव्हापासून शिंदे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यातील जवळीत वाढली आहे. त्याचे निमित्त होते मनसेचे (MNS) एकमेव आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी बहुमत चाचणीवेळी शिंदे सरकारला पाठिंबा दर्शवला. बंडखोरीनंतर शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात हळुहळु कटुता वाढत गेली. अन् शिंदेंनी राज ठाकरेंशी जवळीक निर्माण केली. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर आहेत. हिवाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या या दौऱ्यात राज ठाकरेंनी आज एकनाथ शिंदेंची भेट घेतली अन् पुन्हा एकदा नव्या चर्चेला उधाण आलं.
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. या दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ बंद दाराआड चर्चाही झाली. नक्की कोणत्या विषयांवर बोलणं झालं, याबद्दल मात्र कोणतीही माहिती हाती आलेली नाही. त्यामुळे आता या भेटीबद्दलच्या तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्यातच राज्यातील अनेक महत्त्वाच्या महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे या भेटीला महत्त्व आलं आहे.
या भेटीनंतर आता राज ठाकरे आणखीही काही मंत्र्यांची आणि नेत्यांची भेट घेणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याही भेटीला राज ठाकरे जाणार आहेत. दरम्यान, या सगळ्या गाठीभेटींच्या सत्रामुळे राज ठाकरेंचा नागपूर मुक्कामही वाढला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती नवी समीकरणे शिजणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. राज ठाकरे अनेक वेळा आपल्या भुमिका बदलताना पाहायला मिळताना दिसतात. त्यामुळे या भेटीमागील आंदाज लावणे अनेक राजकिय विश्लेकांना कठीण जात आहे.