ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“…मतदान पदरात पाडून घ्या, बाकी गेलं तेल लावत;” राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल..

पुणे : (Raj Thackeray On Eknath Shinde) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका, सभा, भेटी-गाठी यांचे सत्र सध्या वाढले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकार जोरदार हल्लाबोल केला आहे. शहर अनियंत्रितपणे वाढत आहे. कोणाला याची काळजी नाही. मतदार वाढवा, मतदान पदरात पाडून घ्या आणि बाकी गेलं तेल लावत, अशी सरकारची मानसिकता असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, राज्यातील रस्त्यांवर खड्डे पहिल्यांदा पडलेले नाहीत. याआधीही खड्डे होते. मला आश्चर्य जनतेचे वाटतं. प्रत्येकवेळी लोकप्रतिनिधी तुमच्यासमोर खड्डे आणि इतर मुद्दे उपस्थित करत असतात. काम मात्र करत नाहीत. पण पुन्हा पुन्हा तुम्ही त्याच नेत्यांना जातीच्या, धर्माच्या मुद्द्यावरुन निवडून देतात. हे प्रश्न तसेच राहतील. जोपर्यंत लोकांचा राग मतपेटीमध्ये उतरत नाही तोपर्यंत हे खड्डे बुजणार नाहीत, असं ते म्हणाले.

कायदा नावाची गोष्ट राहिलेली नाही. निवडणुका कधी होतील तर आम्हाला वाटतील तेव्हा होणार अशी यांची भूमिका आहे. मतदार वाढवा, मतदान पदरात पाडून घ्या आणि बाकी गेलं तेल लावत अशी यांची मानसिकता आहे. तुम्ही त्यांना काही विचारत नाही, त्यामुळे सरकारचं लक्ष नाही. काही नियम असतात, लोकसंख्येनुसार किती हॉस्पिटल असावे, किती घरं असावी याची प्लॅनिंग असते. मुंबईतील ब्रिटिश काळातील प्लॅनिंग चांगलं होतं. असल्या गोष्टी आपल्याकडे होत नाहीत. जन्म झालाय म्हणून जहताहेत,अशी उदिग्न प्रतिक्रिया राज यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये