ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

6 व्या मजल्यावर एक IAS अधिकारी मुख्यमंत्र्यांना शिव्या घालत होते.…”; राज ठाकरे

मुंबई : (Raj Thackeray On Eknath Shinde) तेजपर्व या संस्थेने आयोजित भावी IAS अधिकाऱ्यांच्या सत्कार आयोजीत केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते हा सत्कार झाला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. राज ठाकरे म्हणाले, तुम्हाला लोकशाहीची ताकद आता कळली असेल. ज्याला दहावीला 42 टक्के गुण पडलेला आयएएस अधिकाऱ्यांचा सत्कार करत आहे.

राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मंत्रालयातील एक किस्सा सांगितला. “एकदा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर एक आयएएस अधिकारी मुख्यमंत्र्यांना शिव्या घालत होते. तिथे सर्व जमले, पत्रकार देखील जमले. त्या अधिकाऱ्याला विचारलं तुम्ही मुख्यमंत्र्यांना शिव्या का घालत आहात. त्यावर तो अधिकारी म्हणाला असूदेत मी पर्मनंट आहे, ते टेम्पररी आहे. तुम्ही तुमची ताकद ओळखा”, असा आत्मविश्वास राज ठाकरे यांनी भावी अधिकाऱ्यांना दिला.

राज ठाकरे म्हणाले, “कुठेही गेलात तरी तुमच्या मनात महाराष्ट्राचा आदर असला पाहिजे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्या राज्याबद्दल प्रेम असू शकतं तर तुम्हालाही असलं पाहिजे. पंतप्रधानांना वाटतं ना प्रत्येक गोष्टी गुजरातमध्ये गेल्या पाहिजेत. असं तुम्हाला वाटलं पाहिजे.” महाराष्ट्राप्रती स्वार्थ असला पाहीजे असं यावेळी त्यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये