ताज्या बातम्यापुणेरणधुमाळी

अन् मनसेने लोकसभेसाठी डाव टाकला; मावळ घेण्यासाठी राज ठाकरेंचे मनसैनिक कामाला..

पुणे : (Raj Thackeray On Maval Lok Sabha) काही महिन्यांवर येवून टेकलेल्या लोकसभा निवडणूकांसाठी सर्वच राजकिय पक्ष कामाला लागले आहेत. पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी सभा, बैठका, आढावा, चर्चा या गोष्टींना सध्या ऊत आला आहे. त्यातच आता आजपर्यंत कधीही न लढलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मनसे डाव टाकायला सुरुवात केली आहे.

मावळ लोकसभा हा सर्वच पक्षांना हवा असणारा मतदार संघ आहे. सध्या या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे करत आहेत. या अगोदर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी २०१४ला निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. मनसेच्या पाठिंब्यावर त्यांनी ही निवडणूक लढवली होती. त्यानंतर २०१९ला या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना देखील उमेदवारी देण्यात आली होती. यासाठी राष्ट्रवादीने चांगलीच कंबर कसली होती. मात्र त्यात त्यांना यश आले नाही.

या संदर्भात मनसेची बैठका घेण्यास सुरुवात झाली आहे. मनसे आतापर्यंत मावळमधून कधीही लढलेले नाहीत. मात्र यंदाच्या निवडणुकीत मावळसाठी मनसे उमेदवार देणार असल्याचा चर्चा आता सुरू झाल्या असून तशा बैठकांना देखील सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत उमेदवार अद्याप जरी फायनल झाला नसला तरी मनसेकडून मात्र जय्यत तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये