“…तर पदं सोडा”; राज ठाकरे पदाधिकाऱ्यांवर संतापले

मुंबई : (Raj Thackeray On Office bearer) मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सोमवार दि. 14 रोजी मनसेच्या वतीने वांद्रे येथिल एनआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना थेट इशारा दिला. तुम्हाला पक्षाचं काम करायचं नसेल तर पदं सोडी आणि चालते व्हा, असं म्हणत पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे.
दरम्यान राज म्हणाले, तुम्हाला निट काम करायचं नसेल तर पदावर काशाला राहाता? पदावरुन दूर व्हा अशा शब्दांत त्यांनी खडसावलं. विभागीय पातळीवर जे पदाधिकारी पक्षाचं काम करत नाहीत, त्यांची यादी बनवण्याचे आदेश राज ठाकरेंनी विभाग प्रमुखांना दिले आहेत. आगामी काळामध्ये सर्वांनीच कामामध्ये सुधारणा करा, लोकांपर्यंत जावून कामं करा, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.
पुढील महिन्यापासून राज ठाकरे दौऱ्यावर निघणार आहेत. सुरुवातील ते कोकण विभागाचा दौरा करतील. त्यानंतर ते विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यामध्ये ते जिल्हा आणि तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याची माहिती आहे.