ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित राज ठाकरेंनी केली ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी…

मुंबई : (Raj Thackeray On Shinde-Fadnavis Government) मागील दोन आठवड्यापासून राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे बळीराजाने पोटच्या लेकराप्रमाणे जपलेली पिकं डोळ्यासमोर मातीत मिसळली आणि होत्याचे नव्हतं झालं. निसर्गाची संकटे हे शेतकऱ्यांच्या पाचविला पुजलेली आहेत. मात्र, कधी नव्हे एवढा आज शेतकरी खचून गेला आहे. मराठवाड्यात तर सोयबीन, कापूस, फळबागांचे आतोनात नुकसान झालं आहे.

दरम्यान, याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहित राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. “ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाचा मोठ्या प्रमाणानर फटका बसला आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ओला दुष्काळ जाहीर करुन, शेतकरी बांधवांना तातडीने मदत करावी” असं राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलं आहे.

यापुर्वी भाजप-शिंदे गटाने अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या राज ठाकरे यांच्या मागणीला यश आलं होतं. आता पुन्हा राज यांनी पत्रातून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार या पत्रावर काय निर्णय घेणार याकडे बळीराजाचे लक्ष लागून राहिलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये