ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

Rajasthan Election: राजस्थान विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली; जाणून घ्या नेमकं कारण काय?

नवी दिल्ली | Rajasthan Assembly Election – राजस्थान निवडणुकीबाबत (Rajasthan Election) केंद्रीय निवडणूक आयोगानं (Election Commission) मोठा निर्णय घेतला आहे. आता निवडणूक आयोगानं राजस्थान विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली आहे. 23 नोव्हेंबर रोजी राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार होते. पण आता 25 नोव्हेंबर या दिवशी मतदान पार पडणार आहे.

राजस्थानमध्ये धार्मिक कार्यक्रम आणि विवाह सोहळा आयोजित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानाची तारीख बदलण्याची मागणी करण्यात येत होती. तर आता निवडणूक आयोगाकडून मतदानाची तारीख बदलण्यात आली आहे.

23 नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये मतदान पार पडणार असल्यामुळे राजस्थानमधील अनेक सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी चिंता व्यक्त केली होती. तसंच अनेक विवाह सोहळे देखील 23 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहेत. त्यामुळे अनेकांनी त्यादिवशी मतदान करता येणार नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे निवडणूक आयोगानं 25 नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.


Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये