ताज्या बातम्यामनोरंजन

घटस्फोटाच्या चर्चा अन् राजीव सेननं शेअर केले बायकोसोबतचे रोमँटिक फोटो; नेटकरी म्हणाले, “लग्नाला खेळ समजलं…”

मुंबई | Rajeev Sen – गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेनचा (Sushmita Sen) भाऊ राजीव सेन (Rajeev Sen) आणि त्याची पत्नी चारू असोपा (Charu Asopa) चर्चेत होते. राजीव सेन आणि चारू आसोपा यांच्यात बिनसल्यामुळे ते एकमेकांपासून विभक्त होणार होते. ते दोघं घटस्फोट (Divorce) घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तसंच चारूनं राजीववर अनेक गंभीर आरोप केले होते. अशातच, आता चारूच्या वाढदिवसानिमित्त राजीवनं तिच्याबरोबरचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे नेटकरी देखील गोंधळात पडले आहेत.

राजीवनं पत्नी चारूच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट लिहिली आहे. त्यानं पत्नी आणि मुलीबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चारू..खूप सारं प्रेम…तुला चांगलं आरोग्य लाभो” असं म्हणत राजीवनं कॅप्शनमध्ये हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. राजीवनं शेअर केलेल्या या पोस्टमुळे त्याचे चाहतेही संभ्रमात पडले आहेत.

तर चारूनंही राजीवसोबतचे हे फोटो शेअर करत त्याचे आभार मानले आहेत. “थँक्यू राजीव, माझा वाढदिवस स्पेशल बनवल्याबद्दल” असं तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे राजीव आणि चारूच्या पोस्टनंतर यांचं नक्की चाललंय तरी काय?, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. तसंच नेटकऱ्यांनी त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांना ट्रोल देखील केलं आहे.

काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे की, “यांचं नक्की काय चाललं आहे? आधी घटस्फोट घेणार होते आणि आता एकत्र दिसत आहेत” तर एकानं म्हटलंय की, “हे कधी घटस्फोट घेतात, तर कधी एकत्र दिसतात, लग्नाला खेळ समजलं आहे.” तर दसऱ्यानं तुमचं जीवन एक विनोद असल्याचं म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये