ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

मराठा आंदोलकांकडून राजेश टोपेंच्या गाडीची तोडफोड

जालना | Rajesh Tope : मराठा आंदोलकांकडून शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. मराठी आंदोलकांनी घोषणाबाजी करत राजेश टोपेंच्या गाडीवर दडफेक केली. जालना जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर राजेश टोपेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे.

जालन्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खाली राजेश टोपेंची गाडी उभी होती. त्यावेळी काही अज्ञात मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत राजेश टोपेंच्या गाडीवर दगडफेक केली. या घटनेमध्ये टोपेंच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. तसंच त्यांच्या गाडीजवळ एक लाकडी दांडा आणि ऑइलची बॉटल सापडली आहे.

या घटनेची माहिती मिळताच तेथील स्थानिक पोलीस आणि राजेश टोपेंचे समर्थक घटनास्थळी दाखल झाले आहेत. आता पोलीस दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्हीची पाहणी करत आहेत.

दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका सुरू आहेत. यासाठी राजेश टोपे बँकेत आले होते. त्यावेळी काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये