ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

“शेतकरी आंदोलनाच्या वेळी मोदी सरकारने धमकावलं”, ट्विटरच्या माजी सीईओच्या आरोपांवर केंद्र सरकारचं उत्तर, म्हणाले…

नवी दिल्ली : (Rajiv Chandrashakhar On Jack Dorsey) ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी भारत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं की, २०२०-२१ मध्ये भारत सरकारने शेतकरी आंदोलनाच्या बातम्या देणाऱ्या ट्विटर खात्यांवर कारवाई करण्याची अनेक वेळा दबाब टाकला होता. जे पत्रकार त्यावेळी शेतकरी आंदोलनावरील सरकारच्या भूमिकेवर टीका करत होते. त्यांच्या ट्विटर खात्यांवर कारवाई करावी, अन्यथा ट्विटरच्या कर्मचाऱ्यांच्या घरांवर छापेमारी करू, असं केंद्र सरकारने ट्विटरला धमकावलं असा दावा डॉर्सी यांनी केला आहे.

दरम्यान, जॅक जोर्सी यांचे सर्व आरोप केंद्र सरकारच्या वतीने तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी फेटाळले आहेत. ट्विटरवर भारत सरकारकडून दबाव आणाला जात होता, हा आरोप पूर्णपणे निराधार असल्याचं त्यांनी सांंगितलं आहे. याउलट संशयास्पद निर्णयावर पांघरूण घालणं, हा हेतू ट्विटरचे सीईओ या नात्याने जॅक डोर्सी असावा. ट्विटरच्या टीमनं 2020 ते 2022 च्या दरम्यान सतत भारताच्या कायद्यांचं उल्लंघन केलं आहे.

चंद्रशेखर म्हणाले, भारतातील ट्विटरचा कोणाताही कर्मचारी तुरुंगात गेला नाही किंवा ट्विटरही बंद झालं नाही, डोर्सी यांच्या नेतृत्वाखाली ट्विटरला भारतातील कायद्यांचं पालन करणं अडचणीचं ठरत होतं. त्यांना भारताचा कायदा लागू होत नाही, अशाप्रकारे ते वागत होते, भारत हा एक सार्वभौम देश आहे. त्यामुळे भारतात कार्यरत असलेल्या सर्व कंपन्यांनी भारतीय कायद्यांचे पालन केलं पाहिजे, हे सुनिश्चित करण्याचा अधिकार भारत सरकारचा आहे.

शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक प्रकारची बनावट माहिती पसरवली जात होती. मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याच्या बातम्या येत होत्या, त्या पूर्णपणे अफवा होत्या. अशी बनावट माहिती देणारे खाते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याची जबाबदारी सरकारची होती. अन्यथा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकली असती. डोर्सी हे ट्विटरवरून भारताविषयी खोटी माहिती काढून टाकण्यात इच्छुक नव्हते. पण, जेव्हा अमेरिकेत अशा घटना घडल्या, तेव्हा त्यांना ट्विटरवरून बनावट माहिती काढून टाकणं भाग पडलं, अशी प्रतिक्रिया राजीव चंद्रशेखर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये