ताज्या बातम्यापुणे

लोखंडी सळया वाकवल्या, पिंजरा तोडला; कात्रजच्या प्राणीसंग्रहालयातून बिबट्याने ठोकली धूम

पुणे | कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील (Rajiv Gandhi Zoological Park Katraj) विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेला बिबट्या पिंजऱ्यातून सोमवारी पहाटेच्या सुमारास पसार झाला आहे. त्याचा संग्रहालय प्रशासनाकडून शोध सुरु असून रात्री उशिरापर्यंत शोध न लागल्याने खळबळ माजली आहे. (Pune Latest News)

सळया वाकवून बिबट्या पसार

या संग्रहालयात तीन मादी व एक नर बिबट्या आहे. हंपीहून आणणेला नर बिबट्या पिंजऱ्यातून पसार झाला आहे. नेहमीचे कर्मचारी काम करीत असताना सकाळी साडेनऊच्या सुमारास पिंजऱ्यात बिबट्या नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. पिंजऱ्याच्या लोखंडी सळया वाकवून बिबट्या पसार झाला असावा, अशी शक्यता आहे.

संग्रहालयात असलेले अनेक प्राणी आणि जवळच असलेल्या दाट लोकवस्तीमुळे सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ‘हा बिबट्या प्राणी संग्रहालयाच्या आवारातच आहे. अनाथालयाच्या परिसरातील पाण्याच्या टाकीजवळील झुडपांमध्ये तो लपला आहे. रात्री उशिरा तो आढळला असला, तरी त्याला रात्री बेशुद्ध करणे शक्य नाही. त्यामुळे तीन ठिकाणी पिंजरे लावून त्यात भक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यात तो सापडू शकेल,’ असे राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील विलगीकरण कक्षाचे समन्वयक श्रीराम शिंदे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये