क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

“त्यांच्या गुन्ह्यात काहीही दम नाही; मात्र काही गोष्टी…;” ईश्वरलाल जैन यांची ईडी कारवाईवर संतप्त प्रतिक्रिया

जळगाव : (Rajmal Lakhichand On ED Inquiry) राजमल लखीचंद अर्थात आर. एल. समूहाच्या विविध आस्थापनांवर  सक्तवसुली संचालनालय अर्थात ‘ईडी’कडून आणि आयकर विभागाकडून एकाचवेळी छापेमारी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सक्तवसुली संचालनालय व आयकर विभागाच्या सुमारे २० अधिकाऱ्यांच्या पथकांकडून ही तपासणी करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. आज देखील सकाळपासून ही चौकशी सुरू आहे. मात्र याला कुठेतरी राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे तब्बल पंधरा वर्षे खजिनदार राहिलेल्या तसेच जळगाव शहरातील राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्ससह मुंबई, नागपूर, संभाजीनगर येथून ईडी पथकाच्या दहा गाड्या गुरुवारी एकाच वेळी जळगाव जिल्ह्यात दाखल झाल्या. माजी आमदार मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या मालकीच्या जळगाव सह नाशिक मधील एकूण सहा कंपन्यांवर त्यांनी एकाच वेळी छापेमारी करत त्या ठिकाणी असलेल्या मालमत्ता आणि कागदपत्रांची तपासणी सुरू केली. सक्तवसुली संचालनालय आणि आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली.

स्टेट बँक कडून घेतलेल्या सहाशे कोटी रुपयांच्या थकीत कर्ज विषयक गुन्हा सीबीआयने दाखल केला होता त्यानंतर ईडी कडून ही कारवाई करण्यात आली आहे. सीबीआय च्या चौकशीनंतर आता ईडीने चौकशी सुरू केली आहे. हे त्यांचं काम आहे. त्यामुळे ते त्यांचं काम करत आहेत. ही चौकशी सुरू आहे. मात्र त्यात काहीही राजकीय हस्तक्षेप नसल्याचे आर एल समूहाचे ईश्वरलाल जैन यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात काहीही दम नाही. मात्र काही गोष्टी नीट व्हायला वेळ लागतो अशी प्रतिक्रिया ईश्वरलाल जैन यांनी दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये