थलायवा रजनीकांत पोहोचले मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंची घेतली भेट, राजकीय चर्चेला उधाण
मुंबई : (Rajnikant Meet Uddhav Thackeray) सिनेसृष्ठीतील सुपरस्टार दक्षिनात्य अभिनेता रजनीकांत सध्या मुंबईमध्ये आहेत. काल वानखेडे स्टेडिअममध्ये बसून मॅच पाहिल्यानंतर आज रजनीकांत उद्धव ठाकरे यांची भेड घेण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंची भेटही घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
सुपरस्टार थलायवा अभिनेता रजनीकांत उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आले आहेत. ही कोणतीही राजकीय भेट नाही. तर रजनीकांत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चाहते आहेत, त्यामुळे ते मातोश्रीवर आले आहेत. रजनीकांत यांचे ठाकरे कुटुंबीयांशी कौटुंबिक नातेसंबंध आहेत. त्यामुळे ही भेट होत आहे. ही वैयक्तिक भेट असल्याची माहिती रजनीकांत यांनी माध्यमांना दिली आहे.
सुपरस्टार रजनीकांत मुंबईतल्या वानखेडे स्टेडिअममध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही मॅच पाहायला आले होते. बीसीसीआयकडून त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांनी त्यांचं स्वागतही केलं.