रणधुमाळीराष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

राजसाहेब; सातत्य, संघटन आणि समस्येवर बोला!

-मधुसूदन पतकी

बिहारसारखे बीमारू राज्य करायचे नाही. म्हणून तर मूळ नागपूरचे पण मुंबईत स्थिर झालेल्या नेत्यांना मुंबई हातची सोडायची नाहीए.

राज ठाकरे यांनी मिशन विदर्भ हाती घेतले आहे. पाच दिवस ते नागपूर दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी २०१९ नंतर विदर्भ दौरा सुरू केला आहे. तीन वर्षे किंवा निवडणुकीनंतर प्रथमच ते या भागात येत आहेत. त्यांना प्रतिसाद मिळत आहे असे दिसत, वाटत असले, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांची लोकप्रियता मतपेटीत किती बदलते यावर त्यांच्या या दौऱ्याचे फलित सामावले असेल. अर्थात दीर्घकालीन राजकारण करायचे असेल, तर एखाद्या दौऱ्यावर यश-अपयश मोजता येत नाही. राज ठाकरे यांना अजून खूप पल्ला गाठायचा आहे. मुंबई महापालिकेसाठी ही चाचणी असेल.

मुंबई आणि विदर्भाचे प्रश्न वेगळे असले, तरी निवडणुकीची व्यूहरचना करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे राज ठाकरे ज्यात माहीर आहेत, ते दबावाचे राजकारण करण्यासाठी त्यांना हा दौरा उपयोगी पडेल. विदर्भाचे प्रश्न वेगळे आहेत. अनुशेष आणि वेगळा विदर्भ हा त्यांचा कळीचा मुद्दा आहे. खरे तर विदर्भात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद राहिले आहे. वसंतराव नाईक सलग सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यानंतर सुधाकरराव नाईक, देवेंद्र फडणवीस, मारोतराव कन्नमवार हे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

मात्र विदर्भाचे म्हणून जे प्रश्न आहेत ते सुटले नाहीत, सामोपचाराने सोडवले नाहीत किंवा सोडवायचे नाहीतच. स्वतंत्र विदर्भ हा तर गैरलागू मुद्दा आहे. वारंवार तो का पटलावर आणला जातो आणि तोही महाराष्ट्राचे महाधिवक्ता राहिलेल्या श्रीहरी काणे यांच्यासारख्या विद्वानांकडून हे समजत नाही.

तेव्हा राज ठाकरे यांना विदर्भ जिकायचा असेल, शिवसेनेची मोकळी होणारी जागा पटकवायची असेल, काँग्रेस आणि भाजपला पर्याय उभा करायचा असेल, तर प्रथम सातत्य, नंतर संघटन आणि समस्या यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. स्वतंत्र विदर्भ होणार नाही कारण ते राज्य चालवण्यासाठी त्यांच्याकडे आहे काय? खापरखेड, चंद्रपूरची वीज? आणि ती किती दिवस पुरणार? काही कोळसा खाणी, अभ्रक बाकी काय. बिहारसारखे बीमारू राज्य करायचे नाही. म्हणून तर मूळ नागपूरचे पण मुंबईत स्थिर झालेल्या नेत्यांना मुंबई हातची सोडायची नाहीए. तेव्हा मुंबईतले, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना हा विचार करून विदर्भासाठी काम केले पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये