ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

आता फक्त मरण स्वस्त, त्याला कधी GST लावता? राजू शेट्टींचा केंद्राला संतापजनक सवाल

मुंबई : (Raju Shetti On Modi government) देशातील वाढत्या महागाईनं येवढं डोकं वर काढलं आहे, की सर्वसामान्यांना जीवन जगण अवघड होऊन बसलं आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, शिक्षण हे सर्व सामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले आहे, तर दवाखाना परवडत नाही, दोन दिवसांपुर्वी केंद्र सरकारनं तेल, मीठ, चटणी, तांदूळ, डाळ, दही, साखर, वह्या-पुस्तके यांवरही जीएसटी लावण्यात आला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेने जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या बैठकीत पॅकबंद आणि लेबल केलेले मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखाना, कोरडे सोयाबीन, मटार यांसारख्या उत्पादनांचा जीएसटीमध्ये समावेश करण्यात आला. तर गहू आणि इतर तृणधान्ये आणि तांदूळ यावर ५ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

गहू, तांदूळ, तृणधान्ये, सोयाबीन, मटार यासारख्या काही धान्यांवर ५ टक्के जीएसटी लागू केल्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. या निर्णयानंतर अनेक स्तरातून केंद्राविरुद्ध संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आता फक्त मरण स्वस्त आहे. त्याला कधी जीएसटी लावता? असा संतापजनक सवाल केंद्र सरकारला केला आहे. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये