नवाब मलिकांना ठेंगा, राखी जाधवांची बढती; राष्ट्रवादीच्या ‘या’ महत्त्वाच्या पदावर शरद पवारांकडून नियुक्ती
मुंबई : (Rakhi Jadhav On Nawab Malik) राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडूनही (NCP Political Crisis) मुंबई अध्यक्ष बदलण्यात आला असून त्या ठिकाणी राखी जाधव (Rakhi Jadhav) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या आधीचे अध्यक्ष नवाब मलिक यांच्या ठिकाणी ही नियुक्ती झाल्याचं जाहीर करण्यात आलं. नवाब मलिक वैद्यकीय जामिनावर असल्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून ही नियुक्ती करण्यात आली. या आधी अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांची मुंबईच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नबाव मलिक यांची तुरुंगात रवानगी झाल्यानंतर त्यांच्या कार्याचा अतिरिक्त भार हा महापालिकेच्या गटनेत्या राखी जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर राखी जाधव यांनी शरद पवारांची साथ कायम ठेवली. दरम्यानच्या काळात नवाब मलिक हे जामीनावर बाहेर आले असले तरी त्यांची भूमिका स्पष्ट नव्हती. ते अजित पवार गटाला साथ देणार असल्याचीही चर्चा होती. पण मलिकांनी अद्याप त्यांची भूमिका जाहीर केली नाही.
राखी जाधव या मुंबई महापालिकेच्या राष्ट्रवादीच्या गटनेत्या आहेत. राखी जाधव घाटकोपरमधून तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळेंच्या त्या जवळच्या मानल्या जातात.