“आदिलनं मला लग्न लपवून ठेवायला सांगितलं होतं कारण…”, राखीनं केला मोठा खुलासा

मुंबई | Rakhi Sawant – सध्या ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत (Rakhi Sawant) ही चांगलीच चर्चेत आहे. राखीनं तिचा बाॅयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत लग्न केलं आहे. तसंच त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. राखीनं स्वत: तिच्या लग्नाचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. सोबतच तिनं लग्नाबाबत मोठा खुलासाही केला आहे .

राखी सावंतनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत राखी आणि आदिल यांच्या गळ्यात वरमाळा आणि हातात मॅरेज सर्टिफिकेट दिसत आहे. या मॅरेज सर्टिफिकेटमध्ये लग्नाची तारीख 29 मे 2022 लिहिलेलं दिसत आहे. तसंच राखीचं हे दुसरं लग्न असून या लग्नाबद्दल तिनं नुकताच खुलासा केला आहे.

राखी म्हणाली की, मी आणि आदिलनं लग्न केलं आहे. सात महिन्यांपूर्वीच आमचं लग्न झालंय. आम्ही आधी कोर्टात लग्न केलं आहे आणि त्यानंतर निकाह केला. हे लग्न मला आदिलनं लपवून ठेवायला सांगितलं होतं. त्यामुळे या लग्नाबद्दल मी 7 महिने लपवून ठेवलं होतं. पण आता आमचं लग्न सगळ्यांसमोर येणं गरजेचं आहे. कारण सध्या माझ्या आयुष्यात खूप काही घडत आहे.

आदिलला असं वाटत होतं की जर आमच्या लग्नाचं सत्य बाहेर समजलं तर त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी कोणीही मुलगा सापडणार नाही. तिला लग्नासाठी मुलगा शोधणं कठीण होईल. माझ्याबरोबर तुझं नाव जोडलं गेलं तर माझी बदनामी होईल, असं त्याला वाटतं होतं. म्हणून त्यानं मला हे लग्न लपवण्यास सांगितलं होतं”, असंही राखी म्हणाली.

Sumitra nalawade:

View Comments (0)