ताज्या बातम्यामनोरंजन

आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणी राखी सावंतनं व्यक्त केली शंका; म्हणाली, “नक्कीच…”

मुंबई | Rakhi Sawant – भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं (Akanksha Dubey) रविवारी (26 मार्च) आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येमुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. तसंच आकांक्षाच्या मृत्यूचं कारण अद्याप समजलेलं नाहीये. पण आकांक्षाच्या कुटुंबियांनी तिचा कथित बाॅयफ्रेंड समर सिंहवर गंभीर आरोप केले आहेत. अशातच, आता या प्रकरणावर अभिनेत्री राखी सावंतनं (Rakhi Sawant) प्रतिक्रिया दिली आहे.

विरय भय्यानीनं राखी सावंतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राखी आकांक्षा दुबेच्या आत्महत्या प्रकरणावर बोलताना दिसली. यावेळी राखीनं तिच्या मृत्यूबाबत शंका देखील उपस्थित केली आहे.

राखी म्हणाली की, “आकांक्षा दुबेच्या आत्महत्येची बातमी ऐकून मला धक्काच बसला. या धक्क्यातून मला अजूनही सावरता येत नाही. तिचं मी सोशल मीडिया अकाऊंट पाहिलं. तसंच तिचे फोटो आणि व्हिडीओ सर्व गोष्टी पाहिल्या. ती आत्महत्या करण्यापूर्वी एका व्हिडीओत रडत होती. याचा अर्थ नक्कीच काहीतरी झालं आहे. तुम्हालाही वाटतं का की ही आत्महत्या असेल?”, असा सवालही राखीनं उपस्थित केलाय.

“मी सुद्धा प्रेम केलं होतं. पण मी फारच खंबीर असल्यामुळे मी असं पाऊल उचललं नाही. माझ्या जीवनासाठी मी लढले आणि देवानं मला न्याय मिळवून दिला आहे”, असंही राखी म्हणाली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये