राखीने हिजाब घालून केलं नमाज पठण, रोजा ठेवल्यामुळे झाली ट्रोल

मुंबई | ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपासून ती तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. घरगुती हिंसाचार, फसवणुकीच्या आरोपात तिचा पती आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani) सध्या तुरुंगात आहे. पण आता आदिलबद्दल राखी सावंत मवाळ झालेली दिसतेय. रमजानचा महिना येणार आहे आणि या पवित्र महिन्यात प्रत्येकाला माफी मिळण्याचा अधिकार आहे. आदिलला लवकरात लवकर जामीन मिळावा अशी इच्छा राखीने काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती.
राखीने आता स्वतः हिजाब घालून नमाज पठण केल्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रमजानच्या पवित्र महिन्याची सुरुवात झाली आहे. रमजानच्या महिन्याचं निमित्त साधत राखीने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सांगायचं झालं तर आदील खान याच्यासोबत लग्न केल्यानंतर राखीने इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता. शिवाय आदील याने लग्नानंतर राखीचं नाव देखील फातिमा असं ठेवले आहे.
लग्नानंतर पहिला रमजान असल्यामुळे राखीने रोजाचं पालन करत आहे. शिवाय ड्राम क्विनने नमाज पठण देखील केले आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून रखीने पहिला रोजा असल्याची माहिती दिली आहे. सध्या सर्वत्र राखीने पोस्ट केलेल्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्रीला अनेकांनी ट्रोल देखील केलं आहे.