ताज्या बातम्यामनोरंजन

राखी सावंतनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय; म्हणाली, “मी आता लवकरच…”

मुंबई | Rakhi Sawant – बाॅलिवूड अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या चांगलीच चर्चेत आहे. राखीनं तिचा पती आदिल खानवर (Adil Khan) फसवणूक व मारहाण केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. तसंच तिनं आदिलविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अशातच आता राखीनं एक मोठा निर्णय घेतला आहे.

राखीनं आता नवीन सुरूवात करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे ती नुकतीच दुबईला (Dubai) रवाना झाली आहे. या दरम्यानचा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती मुंबई विमानतळावर दिसत असून तिनं तिच्या नव्या इनिंगची माहिती चाहत्यांची दिली आहे. राखी लवकरच दुबईत तिची स्वतःची अ‍ॅकॅडमी सुरू करत असल्याचं तिनं सांगितलं आहे.

राखी तिच्या नवीन अॅक्टिंग अ‍ॅकॅडमीच्या (Acting Academy) उद्घाटनासाठी दुबईला रवाना झाली आहे. या तिच्या नवीन अ‍ॅकॅडमीचं नाव ‘राखी सावंत अकॅडमी’ (Rakhi Sawant Academy) असं आहे. याबाबतचा एक व्हिडीओ तिनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केला आहे. यात ती म्हणाली की, “मी आता मुंबई विमानतळावर आहे आणि दुबईला जाण्यासाठी सज्ज आहे. तुम्हीही उत्सुक आहात ना? लवकरच माझी नवीन अ‍ॅकॅडमी सुरू होत असून या अ‍ॅकॅडमीचं नाव आहे राखी सावंत अकॅडमी. तुम्ही लवकरात लवकर या अ‍ॅकॅडमीत प्रवेश घ्या. मी देखील बघते दुबईतून या अ‍ॅकॅडमीत प्रवेश घ्यायला कोण कोण येतंय.”

दरम्यान, राखीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. काहीजणांनी तिचं नवीन अ‍ॅकॅडमी सुरू केल्याबद्दल कौतुक केलं आहे तर काहींनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये