सीमेवरील जवानांसाठी राख्या रवाना

धायरी : आधार सोशल ट्रस्ट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती लोकसभा ओबीसी सेल यांच्यातर्फे एक राखी आणि एक शुभेच्छापत्र हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत सीमेवरील जवानांसाठी रक्षाबंधनाच्या सणानिमित्त राखी व शुभेच्छापत्र एकत्रित संकलित करण्यात आल्या. देशभक्तीची ज्योत तेवत ठेवणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थी आणि महिला भगिनींनी उदंड प्रतिसाद दिला.
जवळपास ३००० राख्या, २५०० शुभेछा संदेश जमा करून राजस्थान येथील भारत-पाक सीमेकडे रवाना करण्यात आल्या, अशी माहिती आधार सोशल ट्रस्टचे संतोष चाकणकर यांनी दिली. या उपक्रमास दीपक जगताप (अध्यक्ष-माळी महासंघ पुणे शहर) स्मिता लडकत (महिला-अध्यक्षा माळी महासंघ पुणे शहर), बाळासाहेब लडकत (उपाध्यक्ष), सचिन शिवरकर (उपाध्यक्ष), तसेच सीमा शिवरकर, सारिका जमदाडे, अपर्णा धाडगे, आरती सहाणे, दीपाली माटे, प्रीती म्हेत्रे, वंदना बनकर पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.