‘रक्षाबंधन बंधुता’ अंतर्गत सैनिकांसाठी पाठवल्या राख्या
आम्ही पुणेकर,केअर टेकर्स सोसायटी, कॅम्प एज्युकेशन सोसायटी, सायरस पूनावाला मुलांची शाळा आणि कन्या शाळा यांच्यावतीने ‘रक्षाबंधन बंधुता’ कार्यक्रमांतर्गत सीमेवरच्या सैनिक बांधवांसाठी पुण्याहून राख्यांचे पूजन करून पाठवण्यात आल्या.
या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतल जाधव, मूर्तिकार विवेक खटावकर, पांडुरंग आदर्श सेवा ट्रस्टचे सूरज परदेशी, राजा चव्हाण, वालचंद संचेती, हेमंत जाधव, सोनिया इथापे, प्रशांत वाघ, किशोर मेहता, ज्ञानेश्वर कांबळे, कुमार शिंदे आदी उपस्थित होते.
एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी बॅण्ड वाजवून उपस्थितांचे स्वागत केले. रक्षाबंधन बंधुता उपक्रमाची सुरुवात मराठा रेजिमेंटच्या सैनिक बांधवांना राखी बांधून केली.
विद्यार्थ्यांनी राख्या व ग्रीटिंग कार्ड तयार करून सीमेवरील सैनिकांसाठी पाठवले. उपमुख्याध्यापिका लता भोसले, समाजसेविका सपना परदेशी, प्रशांत वाघ यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन विजय कचरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विजय बेलिटकर, रणजित परदेशी, अमोल अरगडे, अँड. सुफियान शेख यांनी प्रयत्न केले. संतोष फुटक यांनी आभार मानले.