Top 5ताज्या बातम्यादेश - विदेशपुणेमहाराष्ट्ररणधुमाळी

भीमा कोरेगावच्या केसेस विथड्रॅा करण्याची रामदास आठवलेंची मागणी; इतर महत्वाच्या विषयांवर भूमिका स्पष्ट

पुणे : (Ramdas Athawale On bhima Koregaon) भीमा कोरेगावच्या केसेस विथड्रॅा (Bhima Koregaon Case) करण्याची रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मागणी केली आहे. “१ जानेवारीला भीमा कोरेगाव मध्ये लाखो संख्येने आंबेडकर अनुयायी येतात. दलितांच्या, महारांच्या शौऱ्याची आठवण तिथे आहे. स्तंभ येथे सभा घेता येणार नाही असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आमची या निर्णयाला विरोध नाही. आजूबाजूला ज्यांना सभा घ्यायची आहे तिथे सभा घेण्यात यावी याची परवानगी देण्यात यावी याबद्दल मी जिल्हाधिकारी यांना भेटणार आहे. काही राहिलेल्या केसेस तिथल्या लोकांवर आहेत. त्या केसेस उठवाव्यात अशी आम्ही मागणी करत आहोत. “

राहुल गांधींवर आठवलेंची टीका
राजकीय वातावरण एन डी ए साठी चांगले आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढत राहावी. भारत जोडण्याची आवश्यकता नाही बाबासाहेबांनी संविधानाने जोडल्या गेला आहे. काँग्रेस कडे सत्ता होती मात्र त्यांना गांधी, बाबासाहेब यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी होती पण ती त्यांनी नाही केली. काँग्रेस ने भारत जोडला नाही, म्हणून राहुल गांधी यांना ही वेळ आली. बाबासाहेबांचे संविधान मजबूत करण्यासाठी मोदी प्रयत्न करत आहेत म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत.

बिलावाल भुट्टो यांच्यावर आठवलेंची प्रतिक्रिया
बिलावाल भुट्टो यांनी आठवण ठेवली पाहिजे की त्यांच्या आईची हत्या आतंकवाद यांनी केली. भारताशी त्यांनी चांगले नाते ठेवायला पाहिजे. मोदी यांची तुलना लादेन शी करणे म्हणजे चुकीची आहे. त्यांचे डोके ठिकाणावर आहे का?

चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटलांवर आठवले
दादा राज्यातील सिनियर नेते आहेत. त्यांच्या वक्तव्य शी कोण्ही सहमत नाहीय. त्यांनी भीक हा शब्दप्रयोग केला त्यामुळे लोकांना रोष आहे मात्र त्यांनी आता माफी मागितले आहे. मी देवेंद्र जी यांच्याशी बोललो की ३०७ मागे घ्या. आता ते मागे घेतले आहेत. हा विषय लांबावणे योग्य नाही. सर्वांनी शांती ठेवणे आवश्यक आहे.

महाविकास आघाडीच्या महामोर्चावर आठवले

आघाडी ही सध्या एकत्र आहेत. निवडणुकी दरम्यान एकत्र राहतील का नाही माहीत नाही. त्यांना आमदार सांभाळता आले नाहीत म्हणून आता मोर्चे काढतात. राज्यपाल यांच्या वक्तव्य बद्दल आम्ही नाराजी व्यक्त केली आहे.

समान नागरी कायद्याला आमचा पाठिंबा आहे. लोकसंख्या कंट्रोल राहण्यासाठी हा कायदा आहे.

पठाण चित्रपटावर
या सिनेमाला आमचा विरोध नाही. गौतम बुद्ध हे देखील भगवा रंग परिधान करायचे. जसा भगवा रंग भाजप, शिवसेनेचा आहे आमचा पण रंग भगवा आहे. बेशरम शब्द काढला पाहिजे. बेशरम म्हणून कुठला ही रंग नसतो. तो शब्द काढला नाही तर आम्ही देखील आंदोलन करू.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये