ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

भाजप-शिंदे गटाच्या जागा वाटपाच्या वादात, आठवलेंची उडी ‘एवढ्या’ जागाची केली मागणी

मुंबई : (Ramdas Athawale On Chandrashekhar Bawankule) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या जागावाटपाच्या वक्तव्यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना नेते संजय शिरसाठ (Sanjay Shirsath) यांनी बावनकुळे यांना सुनावले आहे. आम्ही 48 जागा लढविण्यासाठी मूर्ख आहोत का? असा सवाल उपस्थित केल्याने हा प्रश्न चांगलाच पेटणार आहे. मात्र, आता या वादात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी उडी घेतली आहे.

दरम्यान, नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले असताना आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपने मत व्यक्त केलंय मात्र आरपीआय, शिवसेना आणि भाजप सोबत राहिली तरच फायदा असल्याचं ते म्हणाले. सध्याच्या वादावरून रामदास आठवले म्हणाले की, बावनकुळेंच्या 50 जागांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असतील तर मी मध्यस्थी करून नाराजी दूर करेन.

आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेसोबत आम्ही कायम राहणार आहेत. एक मंत्रीपद आणि एक एमएलसी मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. लोकसभेसाठी भाजप आणि शिवसेनेने तीन जागा द्याव्यात, यात एक शिर्डी आणि एक मुंबई आणि एक इतर जागा मिळावी अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

पुढे बोलताना आठवले म्हणाले, आगामी नाशिक महापालिकेत 22 जागा मागू. रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या निवडणुका लढणार असल्याचं म्हटलं आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मंत्रीपदाबाबतही मागणी केली आहे. त्यामुळे आगामी काळात आठवले यांना किती जागा आणि मंत्रिपद मिळतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये