कीर्तीकरांच्या मतदारसंघावर कदमांचा दावा! गजाभाऊंचं वय झालंय म्हणत, मुलाच्या उमेदवारीची घोषणा..
मुंबई : (Ramdas Kadam On Gajanan Kirtikar) मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाचे रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आपला दावा सांगितला आहे. खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांचं आता वय झालं आहे, जर ते निवडणुकीला उभे राहणार नसतील तर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे ( Mumbai North West Lok Sabha Election) उमेदवार हे सिद्धेश कदम (Siddhesh Kadam) असतील असं महत्त्वपूर्ण वक्तव्य शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलंय.
त्या बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सिद्धेश कदम यांची चर्चा झाली असेल अशीही शक्यता त्यांनी वर्तवली. रामदास कदम यांच्या वक्तव्यानंतर आता या ठिकाणी शिवसेना शिंदे गटात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
खासदार गजानन कीर्तीकर हे शिंदेंच्या शिवसेनेत असून त्याचे पुत्र अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) हे ठाकरे गटात (Shiv Sena Thackeray) आहेत. ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांचे नाव अंतिम झाल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची चर्चा सुरू आहे. या मतदारसंघात सिद्धेश कदम यांचे फ्लेक्सही झळकताना दिसत आहेत.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ
मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात सध्या गजानान कीर्तीकर हे खासदार आहेत. गजानन कीर्तीकर हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. गजानन कीर्तीकर यांचं या मतदारसंघावर वर्चस्व आहे. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसचे गुरुदास कामत आणि 2019 मध्ये संजय निरुपम यांचा यांचा पराभव केला होता.