ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“तोंड दाबून लाथा-बुक्क्यांचा मार सहन केला” भगव्यासाठी कायपण म्हणणाऱ्या भाईंचा सेनेला जय महाराष्ट्र!

मुंबई : (Ramdas Kadam On Uddhav Thackeray Letter) शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे, विश्वासू, ‘मातोश्री’चे निष्ठावंत, रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना अत्यंत खरमरीत आणि मनातील वेदना व्यक्त करणार पत्र लिहीत शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. भाईंनी पत्रात म्हटलं आहे, ‘मविआ’सरकार स्थापन झालं, तसं मी तोंड दाबून लाथा-बुक्क्यांचा मार सहन करतोय. शिवसेनेचा वाईट काळ असताना माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. तुम्ही मात्र गेल्या ३ वर्षापासून मला मीडियासमोर बोलायला बंधन घातलं. हे सगळं का? कशासाठी? असे एक ना अनेक प्रश्न करत कदमांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे.

दरम्यान, तत्कालीन काॅंग्रेस नेते नारायण राणेंनी शिवसेनेशी पंगा घेतल्यावर रामदास भाईंनी कोकणात राणेंना पुरे हाल करुन सोडलं. संपूर्ण कोकण पिंजून काढलं. कोकणात रामदास भाईंएवढी राणेंना कुणी टक्कर दिली नसेल. राणे पिता-पुत्रांच्या तिहेरी वाराला भाईंचा एकचा बाण पुरुन उरायचा. राणेचं काय तर भाई पवारांनाही खांद्यावर घेयचे आणि अत्यंत जहाल शब्दात त्यांच्यावर तुटून पडायचे. भगव्यासाठी आयुष्य वेचलेल्या, कट्टर हिंदुत्ववादी असणाऱ्या, शिवसेनेचे पहिल्या फळीतील वजनदार नेते असूनही रामदास कदम यांनी राजीनामा का दिला?

त्याचे कारण म्हणजे, बाळासाहेबांनी आयुष्यभर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत संघर्ष केला आणि हिंदुत्व टिकवलं. 2019 ला त्यांच्यासोबत आघाडी युती करु नका. ती बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा होईल. असं मी जिवाच्या आकांतान सांगितलं पण, आपण माझं ऐकलं नाही, याचंही दुःख माझ्या मनामध्ये आहे. भाईंची खरी कोंडी तर तेव्हा झाली, जेव्हा ‘मविआ’सरकार सत्तेमध्ये आलं. ज्यांना आयुष्यभर विरोध केला त्यांच्या मांडीला मांडी लावायची वेळ आली, सरकार बनत असताना रामदास भाईंनी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जायला विरोध दर्शवला. पण, उद्धव ठाकरेंनी भाईंचं मनावर न घेता काँग्रेस राष्ट्रवादीसोबत घरोबा केला आणि हा संसार अर्ध्यावर मोडला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये