भारताचा ग्रँडमास्टर प्रज्ञानानंदची कौतुकास्पद कामगिरी; बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली
Chess World Cup 2023 – भारताचा ग्रँडमास्टर रमेशबाबू प्राज्ञानानंदने (Rameshbabu Praggnanandha) कौतुकास्पद कामगिरी केली आहे. प्रज्ञानानंदने बुद्धिबळ विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत आश्चर्यकारक कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं सोमवारी (21 ऑगस्ट) अमेरिकेच्या फॅबियानो कारूआनाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली.
प्रज्ञानानंदनं उपांत्य फेरीत दोन रॅपिड गेम अनिर्णित राहिल्यानंतर टायब्रेकच्या तिसऱ्या गेममध्ये चतुराईनं फॅबियानो कारूआनाचा 3.5-2.5 असा पराभव केला. तर आता प्रज्ञानानंदनं अतिम फेरीत प्रवेश केला असून त्याचा मुकाबला जागतिक क्रमवारीतला अव्वल खेलाडू मॅग्नस कार्लसन याच्यासोबत होणार आहे.
दरम्यान, प्रज्ञानानंद हा FIDE विश्वचषक 2023 या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये पोहोचला आहे. विशेष म्हणजे प्रज्ञानानंद हा या विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या चार भारतीयांपैकी एकमेव भारतीय आहे.