क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

चौथ्या डावात गुजरात फक्त 54 धावांत धारातिर्थी, विदर्भने रचला इतिहास!

मुंबई : (Ranji Trophy 2023 Vidarbha Cricket Team) रणजी ट्रॉफी 2023 च्या विदर्भ विरूद्ध गुजरात सामन्याचा आज चौथा आणि अखेरचा दिवस होता. या चौथ्या दिवशी विदर्भ संघाने इतिहासच रचला. विदर्भचा डावखुरा फिरकीपटू आदित्य सर्वेतेने गुजरातच्या फलंदाजीला मोठे खिंडार पाडले. त्याने 6 विकेट्स घेत गुजरातला अवघ्या 73 धावा देखील करू दिल्या नाहीत. आदित्य पाठोपाठ हर्ष दुबेने देखील 3 फलंदाज टिपले.

विदर्भने आपल्या दुसऱ्या डावात 254 धावांची खेळी करत गुजरातसमोर विजयासाठी अवघ्या 73 धावांचे आव्हान ठेवले होते. विशेष म्हणजे विदर्भला पहिल्या डावात फक्त 74 धावा करता आल्या होत्या. विदर्भकडून दुसऱ्या डावात जितेश शर्माने 53 चेंडूत 69 धावांची आक्रमक खेळी केली. तर त्याला नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या नचिकेत भुतेने 42 धावा करून चांगली साथ दिली.

गुजरात दुसऱ्या डावात विदर्भचे अवघे 73 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरला होता. मात्र विदर्भच्या फिरकीपुढे गुजरातच्या फलंदाजांनी नांगी टाकली. गुजरातच्या 11 पैकी 10 फलंदाजांना दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही. संघातील एकट्या सिद्धार्छ देसाईने 18 धावांपर्यंत मजल मारली.

गुजरातचा संपूर्ण संघ 54 धावात पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यानंतर गुणतालिकेत गुजरात चौथ्या स्थानावर घसरली आहे. तर विदर्भ दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे. पहिल्या स्थानावर मध्यप्रदेश आहे. त्यामुळे गुजरातने सामना तर गमावले परंतू हसू देखील करुन घेतलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये