ताज्या बातम्यामनोरंजन

‘डाॅन 3’ चित्रपटातून शाहरूख खानची एक्झिट, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता करणार किंग खानला रिप्लेस

मुंबई | Don 3 – गेल्या काही दिवसांपासून फरहान अख्तरच्या ‘डाॅन 3’ (Don 3) या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून याबाबत घोषणाही करण्यात आली आहे. या चित्रपटात शाहरूख खान (Shah Rukh Khan) मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण शाहरूखनं आता या चित्रपटातून एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली आहे. आता या ‘डाॅन 3’मध्ये शाहरूखची जागा अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) घेणार असल्याचं म्हटलं जातंय.

शाहरूख खाननं ‘डाॅन 3’ या चित्रपटाला नकार दिला असल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटासाठी रणवीर सिंहला निर्मात्यांनी विचारलं होतं. तसंच रणवीरनंही या चित्रपटाला होकार दिला आहे. त्यामुळे आता या चित्रपटात शाहरूख खानच्या जागी रणवीर सिंह दिसणार आहे.

पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख ‘डॉन 3’ चित्रपटात दिसणार नाहीये. त्यानं या चित्रपटाची ऑफर नाकारल्यानंतर निर्मात्यांनी रणवीरला या चित्रपटासाठी विचारणा केली आहे. तसंच ‘डॉन 3’च्या कथेबद्दल गेल्या काही दिवसांपासून फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्यात चर्चा होत होत्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये