“चाहते 100 शतकांचे रेकॉर्ड तोडण्याची नाही तर,…” पाकिस्तानी खेळाडूचं कोहलीवर मोठं विधान!

नवी दिल्ली : (Rashid Latif On Virat Kolhi) भारताची रनमशीन म्हणून ओळखला जाणार फलंदाज विराट कोहलीने बांगलादेशविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात आपले 72 वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. त्याने रिकी पॉटिंगचे रेकॉर्ड मागे टाकले असून आता सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या यादीत त्याचा पुढे सचिन तेंडुलकर आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी खेळाडू राशिद लतिफ यांना विराट कोहली सचिन तेंडुलकरचे शतकांच्या शतकाचे रेकॉर्ड मोडणार हा याबाबत एका यूट्यूब चॅनलवर प्रश्न विचारण्यात आला.
राशिद लतिफ यांना यूट्यूब चॅनवरील एका कार्यक्रमात विराट कोहली सचिनचे 100 आंतरराष्ट्रीय शतकांचे रेकॉर्ड मोडू शकतो का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, ‘मला वाटते की चाहते त्याच्या 100 शतकांचे रेकॉर्ड तोडण्याची नाही तर भारतीय संघ कधी आयसीसी ट्रॉफी जिंकतो याची वाट पाहत आहेत.’ लतिफ यांनी दिलेल्या उत्तरामुळे सध्या ते चांगलेच चर्चेत आले आहेत.
राशिद पुढे म्हणाले की, ‘शतकांची संख्या मोजण्याची ही योग्य वेळ नाही. सध्या याला काही अर्थ नाहीये. भारताच्या दृष्टीने आयसीसी ट्रॉफी जिंकणे जास्त महत्वाचे आहे. भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकून बरेच वर्ष झाली. विराट कोहली 200 शतकं का पूर्ण करेना! त्याला आयसीसी ट्रॉफी जिंकणे गरजेचे आहे.’