ताज्या बातम्यापुणेसिटी अपडेट्स

पुरस्काराने जबाबदारी वाढते : पद्मश्री रवींद्र कुमार

अनिरुद्ध बडवे यांना राष्ट्रपिता राष्ट्रीय सन्मान पुरस्कार

Pune News | राष्ट्रीय पातळीवरती प्रतिष्ठेचा समजला जाणारा, राष्ट्रपिता सन्मान पुरस्कार 2023 आज आठ क्षेत्रातील 50 मान्यवरांना प्रदान करण्यात आला. ग्लोबल स्कॉलर्स एज्युकेशन कौन्सिलच्या वतीने आणि थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी , पॅरिस ( फ्रान्स) च्या संहयोगाने देशभरातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रपिता राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने सन्मानित केले जाते. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध राज्यांमध्ये हा कार्यक्रम होतो.

यंदा हॉटेल ऑर्चिड, पुणे येथील एका दिमाखदार समारंभामध्ये हे पुरस्कार प्रदान झाले .यावेळी दैनिक राष्ट्र संचार चे संपादक अनिरुद्ध बडवे यांना ‘आउटस्टँडिंग परफॉर्मन्स इन जर्नालिझम’ साठी पद्मश्री रविंद्र कुमार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी पत्रकारितेतील धाडस , उपेक्षितांसाठीचे शिक्षण , कष्टप्रद समाजसेवा ,परकीय गंगाजळी आणणारे परदेशी पर्यटन , प्रयोग करणारे शिक्षक अशा अनेक कॅटेगरीमध्ये हे पुरस्कार देण्यात आले.

यावेळी पद्मश्री रविंद्र कुमार यांनी सांगितले की हे पुरस्कार अत्यंत निरपेक्ष आणि कुणाच्याही शिफारशी शिवाय दिले जातात गेल्या अनेक वर्षांपासून या पुरस्कारामुळे समाजातील व्यक्तींना किंवा प्रोत्साहन मिळते असे नव्हे तर त्यांची जबाबदारी अधिकांशाने वाढते आजचा हा पुरस्कार एका नव्या जबाबदारीची सुरुवात आहे अशा दृष्टीने स्वीकारावा.

या समारंभासाठी बिहार, ओरिसा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि गुजरात येथून अनेक पुरस्कारार्थी आले होते .

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये