ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळीसिटी अपडेट्स

“…त्यामुळे त्यांच्या डोक्यातील गांडूळाचा मेंदू नुसता वळवळतो”, ठाणे बंदवरून राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

मुंबई | Mahavikas Aghadi Mahamorcha राज्यपाल कोश्यारी आणि भाजप नेत्यांनी महापुरूषांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांविरोधात आज (17 डिसेंबर) महाविकास आघाडीकडून महामोर्च्याचं (Mahavikas Aghadi Mahamorcha) आयोजन करण्यात आलं आहे. तर महाविकास आघाडीच्या मोर्च्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्यावतीनं (BJP) पुण्यात ‘माफी मांगो’ आंदोलन करण्यात येत आहे. तसंच शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंविरोधात (Sushama Andhare) शिंदे गटाकडून ‘ठाणे बंद’ची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ठाणे शहर बंद आहे. मुख्यमंत्री कशासाठी आपलं शहर बंद करत आहेत. त्यांच्या बाजूला बसलेले गृहमंत्री हे सर्व पाहत आहेत. यांच्याकडे काही काम नसून, डोक्यातील गांडूळाचा मेंदू नुसता वळवळत असतो. तुम्ही राज्यकर्ते असून, विचारांचा प्रतिवाद विचारानं करा आणि उत्तर द्या. आमच्यावर कोणतातरी वारकऱ्यांचा एक गट पकडून सोडून द्यायचा. हे किती काळ चालणार,” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

पुढे ते म्हणाले, “तुमचं राज्य जरी घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असलं तरी तुम्ही सत्तेवर आहात. सत्तेवर असल्याचं भान ठेवा. प्रगल्भता दाखवा, आपण प्रौढ झालो आहोत. खरंतर शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाल्यावर महाराष्ट्र बंद करायला हवा होता. मात्र, आम्ही तो बंद पुढे ढकलला आहे. आम्ही सध्या मोर्चात सहभागी झालो आहोत. माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, ठाणे बंद मागे घ्यावा. कारण, पाचपखाडी आणि वागळे इस्टेट बंद करण्याएवढीच मुख्यमंत्र्यांची ताकद आहे,” असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये