ट्विंकल खन्नासोबत तुलना करणाऱ्या नेटकऱ्याला रवीनाने दिला ‘हा’ सल्ला
मुंबई | बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन (Raveena Tandon) ही तिच्या अभिनयाने तर चर्चेत असतेच पण ती तिच्या पोस्टमुळे सुद्धा अनेक वेळा चर्चेत येत असते. एका नेटकऱ्यानं रवीनाची तुलना ट्विंकल खन्नासोबत (Twinkle Khanna) केल्यानंतर रवीनानं त्या नेटकऱ्याला मजेशीर उत्तर दिलं आहे.
रवीनानं इंस्टाग्रामच्या Ask Me A Question या सेशनच्या माध्यामातून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. या सेशनमध्ये एका नेटकऱ्यानं रवीनाला प्रश्न विचारला की, लहानपणी रवीना आणि ट्विंकल खन्ना यांच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं. मला दोघींमधील फरक लवकर लक्षात येत नव्हता.’ चाहत्याच्या या कमेंटवर रवीनानं असं उत्तर दिलं की, ‘तुम्ही मोतीबिंदूचं ऑपरेशन करुन घ्या. त्याच्यासाठी लागणाऱ्या फंडची व्यवस्था केली जाईल. रवीनाच्या या मजेशीर उत्तराने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.