ताज्या बातम्यामहाराष्ट्रशेत -शिवार

बैठीकीनंतर तुपकरांचा सरकार पुन्हा इशारा, म्हणाले; “15 दिवसाच्या आत मागण्या मान्य न केल्यास…”

मुंबई : (Ravikant Tupkar On Shine-Fadnavis Government) पुढच्या 15 दिवसात शेतकरी हिताच्या मागण्या मान्य न केल्यास राज्य सरकारच्या विरोधात पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. राज्यस्तरावरील बहुतांशी मागण्या आम्ही तातडीने पूर्णत्वास नेवू तसेच केंद्र शासनासंदर्भात असलेल्या मागण्यांबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू असे आश्वासन राज्य सरकारनं दिलं आहे ते त्यांनी पूर्ण करावं.

दरम्यान, गुरुवारी दि. 24 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह रविकांत तुपकरांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. प्रसारमाध्यमांशी बोलताना तुपकर म्हणाले, काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. तब्बल दीड तास चाललेली ही बैठक यशस्वी झाल्याची माहिती तुपकरांनी दिली आहे. मात्र, १५ दिवसाच्या आत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा मुंबईकडे कूच करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

केंद्र शासनासंदर्भात असलेल्या मागण्यांबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू. तसेच  केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक लावू आणि सोयाबीन-कापूस प्रश्नी केंद्र सरकारशी चर्चा करण्यासाठी लवकरच राज्य सरकारचे शिष्टमंडळ घेवून दिल्लीत घेवून जाऊ,असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये