ताज्या बातम्यादेश - विदेश

दोन हजारांच्या नोटा वितरणातून काढल्यानंतर RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, “हा निर्णय…”

नवी दिल्ली | RBI Governor Shaktikant Das – भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) दोन हजार रूपयांच्या नोटा वितरणातून काढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आता आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Governor Shaktikant Das) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दोन हजार रूपयांच्या नोटा चलनात आणण्याचं उद्दिष्ट आता पूर्ण झालं आहे, असं शक्तिकांत दास म्हणाले.

यावेळी शक्तिकांत दास म्हणाले की, “दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी चार महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे लोकांनी हा चार महिन्यांचा कालावधी गांभीर्यानं घ्यावा. दोन हजारांच्या नोटांवर घातलेली ही बंदी नागरिकांनी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण करणारी आहे असा समज करून घेऊ नये.”

“दोन हजार रूपयांच्या नोटा चलनात आणण्याची अनेक कारणं होती. त्यामुळे आता घेतलेला हा निर्णय काही निकषांमुळे घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन हजारांच्या नोटांवर घालण्यात आलेली बंदी नागरिकांनी गांभीर्यानं घेतली तर चांगली होईल. बँकांना दोन हजारांच्या नोटा बदलण्याचा डेटा तयार करावा लागेल आणि नोटांचा सर्व तपशील बँका तयार करतील”, असंही शक्तिकांत दास म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये