अर्थताज्या बातम्यादेश - विदेश

सामान्यांना दिलासा? “…म्हणून महागाई वाढली, पण काळात महागाई कमी होणार”; RBI ची माहिती

RBI Monetary policy : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (Reserve Bank Of India) गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikant Das) यांच्या समवेत बँकेच्या चनलविषयक धोरण समितीची बैठक पार पाडली. त्यानंतर माहिती देताना दास म्हणाले, रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो रेट मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेट ‘जैसे थे’ ठेवल्याने व्याजदर वाढणार नाही, ज्यामुळे EMI भरणाऱ्या कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून चलनविषयक पतधोरण जाहीर करण्यात आले, यावेळी भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

या बैठकीत रेपो दर, जीडीपी वाढ, महागाई आणि इतर आर्थिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, देशाचा आर्थिक विकास दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्यात खाद्य महागाई मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे एकूणच महागाई दरात मोठी वाढ झाली होती. मात्र, आता महागाई दर नियंत्रणात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. डाळी, मसाले आणि भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाल्याने महागाई वाढली होती. रिझर्व्ह बॅंकेच्या या पत्रकार परिषदेत यंदाच्या आर्थिक वर्षात महागाई दर 5.4 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भाजीपाल्यांच्या दरात घट आणि गॅसच्या दरात झालेल्या कपातीमुळे येत्या काळात महागाई आणखी कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

जागतिक महागाईबाबत दास यांनी सांगितले की, याची झळ आणखी काहीकाळ राहू शकेल. जागतिक बाजारात अस्थिरता असल्याने आर्थिक मंदीची झळ अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता आहे. महागाई दर 4 टक्क्यांवर कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही रिझर्व्ह बॅंकेकडून सांगण्यात आले तसेच महागाई दर कमी करण्याच्या उद्दिष्टानं आम्ही काम करत आहोत. मार्ग खडतर आहे, आम्ही काळजीपूर्वक पुढे पाऊलं टाकतोय असेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये