नवी दिल्ली : (RCB vs DC Match Prediction) इंडियन प्रीमियर लीगमधील 17 व्या हंगामातील (Indian Premier League) 50 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात रंगणार आहे. शनिवार 6 मे रोजी दिल्लीच्या घरच्या मैदानावर आज या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. आरसीबी संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर असून दिल्ली संघ सर्वात शेवटच्या दहाव्या क्रमांकावर आहे.
आज दिल्लीच्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. बंगळुरुनं मागील सामन्यात लखनौ संघाचा पराभव केला आहे. अशीच विजयाची घौडदौड कायम ठेवण्यासाठी आरसीबी प्रयत्न करेल. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने मागच्या सामन्यात गतविजेता चॅम्पियन गुजरात टायटन्सचा पराभव केला आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 29 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये बंगळुरुचं पारड जड दिसून आलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 29 पैकी 18 सामने जिंकले आहेत. तर, दिल्ली कॅपिटल्स संघाला 10 सामने जिंकता आले आहेत. एक सामना ड्रॉ झाला. दोन्ही संघांची सर्वाधिक सरासरी धावसंख्या 190 आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बंगळुरु संभाव्य प्लेईंग 11
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोरमोरल, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अनुज रावत, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा, जोश हेजलवुड.
दिल्ली संभाव्य प्लेईंग 11
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, रिले रुसो, अमन हकीम खान, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, पीडी सॉल्ट (विकेटकिपर), एनरिक नॉर्टजे, कुलदीप यादव, इशांत शर्मा.