अर्थताज्या बातम्यादेश - विदेश

खाद्यतेलाबाबत दिलासा देणारी बातमी

नवी दिल्ली | Edible Oil Prices – सर्वसामान्यांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. बुधवारी खाद्य मंत्रालयाने घेतलेल्या खाद्यतेल कंपन्यांच्या बैठकीनंतर खाद्यतेल स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बैठकीत सर्व कंपन्यांचा सहभाग होता. यादरम्यान खाद्यतेलाच्या किमतीत आणखी कपात करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

सरकारने एमआरपीमध्ये बदल करण्याच्या सूचना कंपन्यांना दिल्या आहेत. खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या म्हणण्यानुसार, आगामी काळात दरात आणखी कपात होऊ शकते. सध्याच्या परिस्थितीत प्रति लिटर 20 रुपयांनी दर कमी करण्याचा सरकारचा अंदाज आहे. तसंच सरकारने बोलावलेल्या बैठकीत काही तेल कंपन्यांनी दर आणखी कमी करण्याचे मान्य केलं आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किंमती घसरल्यानंतर देशांतर्गत बाजारातही किंमती कमी होण्याचा अंदाज आहे. तसंच गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत या घसरणीचा लाभ जनतेपर्यंत पोहोचावा, अशी सरकारची इच्छा आहे. तसंच तेलाच्या किमती 20 रुपयांनी कमी केल्याने सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये