मध्य रेल्वेला भाड्याव्यतिरिक्त महसुलाची विक्रमी नोंद

एप्रिल – ऑक्टोबर २०२२ मधील कालावधीत
पुणे : भाड्याव्यतिरिक्त (नॉन-फेअर) महसूल आणि पार्सल महसुलामध्ये मध्य रेल्वेची प्रभावी कामगिरी झाली आहे. भाड्याव्यतिरिक्त महसुलाची रुपये ३९.४५ कोटी आणि पार्सल महसुलाची रुपये १५०.८७ कोटी नोंद करण्यात आली आहे.
3 पर्सनल केअर सेंटर (PCC) दादर, ठाणे आणि कल्याण येथे 5 वर्षांसाठी एकत्रित वार्षिक महसूल ₹ 17.73 लाख. रुपये 6.57 लाख वार्षिक महसूलासह 5 वर्षांसाठी नाशिक रोड येथे POD हॉटेल.
पुणे स्टेशनवर 6.93 लाखांच्या वार्षिक महसूलासह 5 वर्षांसाठी औषध दुकान सुरू करणे
आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये (एप्रिल ते ऑक्टोबर) मध्य रेल्वेची कामगिरी गतवर्षीच्या याच कालावधीतील रुपये १२.१६ कोटीच्या तुलनेत रु. ३९.४५ कोटींच्या विक्रमी महसुलासह प्रभावी ठरली. जी २२४% प्रचंड वाढ दर्शवते. ऑक्टोबर २०२२ मध्ये केलेले प्रमुख करार झाले. बाह्य विनाइल रॅपिंगसाठी पुणे विभागाकडून २ गाड्या (12126/25 आणि 10039/40- ५ रेक) असलेले करार ३ वर्षांसाठी वार्षिक रु. २५.०७ लाख महसुलासह. अंतर्गत जाहिरातीसाठी पुणे विभागाकडून एका ट्रेनचा (12125/26) समावेश असलेला करार ३ वर्षांसाठी वार्षिक रुपये २.०२ लाख महसुलासह आहे.
नागपूर विभागाकडून ट्रेन क्रमांक १२१२० अजनी-अमरावती एक्स्प्रेसमध्ये अंतर्गत जाहिरातींचा समावेश असलेला करार ३ वर्षांसाठी वार्षिक रुपये ३.९४ लाख महसुलासह तर १० रेल डिस्प्ले नेटवर्क रु. ८३.७८ लाख वार्षिक महसुलासह ई-लिलावाद्वारे करार झाले. मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२२-२३ (एप्रिल ते ऑक्टोबर) मध्ये ३.०१ लाख टन पार्सल आणि सामानाच्या वाहतुकीद्वारे रु. १५० कोटींचा महत्त्वपूर्ण महसूलदेखील नोंदवला.
त्यापैकी ऑक्टोबर २०२२ मध्ये २२ कोटींची नोंदणी झाली. ऑक्टोबरपर्यंत वेळापत्रकानुसार पार्सल ट्रेनच्या १५० फेऱ्यांत १०.७५ कोटी महसूल मिळवले आणि २० इंडेंट पार्सल कार्गो एक्सप्रेस ट्रेनने ४.१० कोटी महसूल मिळवले. सध्या ९३ सामान्य द्वितीय श्रेणीसह लगेज व्हॅन (SLR कोच) आणि १५ पार्सल व्हॅन (VP) भाडेतत्त्वावर आहेत.