इतरक्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनसुख हिरेन हत्या प्रकरणी प्रदीप शर्मा यांना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

मुंबई | Mansukh Hiren Murder Case – मनसुख हिरेन हत्या प्रकरण (Mansukh Hiren Murder Case) आणि अँटिलिया बॉम्ब प्रकरणी (Antilia Bomb Case) माजी पालीस अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना दिलासा मिळाला आहे. अटकेत असलेल्या प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी प्रदीप शर्मा यांचा जामीन मुंबई हायकोर्टानं नाकारला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयानं प्रदीप शर्मा यांचा नियमित जामीन मंजूर केला आहे. तसंच याआधी प्रदीप शर्मा यांना त्यांच्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी तीन आठवड्यांचा अंतरिम जामीन देण्यात आला होता. त्यानंतर शर्मा पुन्हा सरेंडर झाले होते. तर आता याच कारणावरून सर्वोच्च न्यायालयानं त्यांचा जामीन मंजूर केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

मनसुख हिरेनच्या हत्येप्रकरणी प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) अटक केली होती. प्रदीप शर्मा यांनी त्यांचा माजी सहकारी सचिन वाझेला मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. तसंच 25 फेब्रुवारी 2021 रोजी उद्योगपती मुंकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली SUV सापडली होती. ही SUV व्यापारी मनसूख हिरेनी यांची होती. त्यानंतर काही दिवसांनी मनसुख हिरेन हे 5 मार्च 2021 रोजी मृतावस्थेत सापडले होते. याप्रकरणी प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये