पुणे

राष्ट्रपती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात अवकाश उड्डाणावर निर्बंध

ष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुणे येथे सिंबायोसिस विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी येणार आहेत. त्यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अवकाश उड्डाणावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

२८ जुलै रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते २९ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन इत्यादी प्रकारच्या अवकाश उड्डाणावर निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.

या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ च्या दंडनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही असेही जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये