मोठी बातमी! रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री
हैदराबाद | Revanth Reddy : काँग्रेसने (Congress) तेलंगणामध्ये (Telangana) मुख्यमंत्र्याच्या नावाचा निर्णय घेतला आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी ((Revanth Reddy) हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील.
समोर आलेल्या माहितीनुसार, तेलंगणात एकूण ११९ जागांपैकी ६४ जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. बीआरएसने ३९ तर भाजपने ८ जागा जिंकल्या आहेत. येथे सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही एका पक्षाला ६० जागांची आवश्यकता होती. काँग्रेसला ३९.४० टक्के, बीआरएसला ३७.३५ टक्के आणि भाजपला १३.९० टक्के मते मिळाली आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेत्यांनी रविवारी संध्याकाळी राज्यपालांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. यानंतर सोमवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) नेतेपदी नियुक्तीसाठी अधिकृत करण्यात आले आहे.