क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

ऋषभ पंतविषयी कोच रिकी पाँटिंगचं मोठं वक्तव्ये! म्हणाले, “माझी अशी इच्छा आहे की,…”

मुंबई : (Ricky Ponting On Rishabh Pant) मागच्या काही दिवसांपुर्वी भारतीय खेळाडू ऋषभ पंत याचा दुर्दैवी अपघात झाला, त्याला गंभीर दुखापत झाली अन् क्रिकेटच्या मैदानावर घाम गाळणाऱ्या ऋषभला गत महिनाभरापासून अंथरुणाला खिळून राहावं लागलं. अपघातानंतर ऋषभवर देहरादून येथे उपचार केले गेले. पण नंतर महत्त्वाच्या शस्त्रक्रियेसाठी त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात आणण्यात आले आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर आपण अपघातातून सावरत असल्याचं सांगतानाच ऋषभने आपल्याला मदत करणाऱ्यांचे आणि विशेष करुन भारतीय नियामक मंडळाचे आभारही मानले. मी आता बरा होतोय, असं सांगून ऋषभला दोन आठवडेही पूर्ण होत नाहीत तोपर्यंतच दिल्ली डेअरडेव्हिल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने ऋषभसंदर्भात मोठी अपडेट दिली आहे.

दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी सांगताना ऋषभ पंत आयपीएल २०२३ मध्ये पुनरागमन करेल, हा मोठा खुलासा केला आहे. पाँटिंग म्हणाले की, “त्याने प्रत्येक सामन्यात डगआउटमध्ये माझ्या शेजारी बसावे अशी माझी इच्छा आहे. जरी तो प्रत्यक्षात खेळण्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नसला तरी त्याने आमच्यासोबत बसावे, अशी संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे. तो संघाचा कर्णधार आहे, दिल्लीचं डॅशिंग नेतृत्व अशी त्याने आपल्या कर्तृत्वाने ओळख बनवली आहे. कर्णधार म्हणून तो ज्यावेळी वावरतो त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या गुणांमुळे तो सगळ्यांना आपलासा वाटतो, त्याच्या नेतृत्वात खेळणं हे दिल्लीच्या खेळाडूंना अभिमानास्पद वाटतं”, असं पॉन्टिंग म्हणाले. आयसीसी रिव्ह्यू शोमध्ये त्यांनी पंतबाबतीत इतरही मुद्द्यांवर भाष्य केलं.

पुढे बोलताना पाँटिंग यांनी म्हटलं, “जर ऋषभ खरोखरच प्रवास करू शकत असेल आणि संघासोबत राहू शकत असेल तर त्याने आठवड्याच्या प्रत्येक दिवशी माझ्यासोबत डगआउटमध्ये बसावे अशी माझी इच्छा आहे. मी निश्चितपणे खात्री देतो मार्चच्या मध्यात आम्ही दिल्लीत एकत्र येऊ, एकदिलाने संघाला पुढे घेऊन जाऊ पण पाठीराखा कर्णधार म्हणून ऋषभची भूमिका यामध्ये महत्त्वाची असेल”.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये