रिंकू सिंहने 39 चेंडूत नाबाद 68 धावा करूनही, ‘या’ कारणामुळे मागितली माफी?
Rinku Singh apologized : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 5 विकेट्स राखून पराभव केला. भारताने 19.3 षटकात 180 धावा केल्या होत्या. मात्र पावसामुळे खेळ वाया गेला अन् दक्षिण आफ्रिकेसमोर 15 षटकात 152 धावांचे आव्हान आले. हे आव्हान त्यांनी 13.5 षटकातच 5 विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताकडून रिंकू सिंहने दमदार खेळी करत 39 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या. त्याचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले वहिले अर्धशतक ठोकलं. मात्र हे अर्धशतक वाया गेलं. चेंडू ओला झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला फायदा झाला अन् भारत हरला.
मात्र सामन्यानंतर रिंकू सिंहने बोलताना माफी मागितली. ज्यावेळी रिंकू सिंहने अर्धशतक ठोकले त्यावेळी त्याने एक दमदार षटकार मारला. हा षटकार थेट कॉमेंटरी बॉक्सवर जाऊन आदळला. बॉक्सची काच फुटली.
रिंकूला सामना झाल्यानंतर मुलाखतीवेळी त्याच्या षटकारामुळे काच फुटल्याचं सांगण्यात आलं. त्यावेळी त्याने यासाठी माफी मागितली. तो म्हणाला की, ‘मला माहिती नाही की माझ्या फटक्यामुळे काच फुटली. त्याबद्दल क्षमस्व.’
रिंकूने 39 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याच्या या खेळीमुळेच भारताने 180 धावांपर्यंत पोहचवले.