ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

कांतारा-2 येतोय! ऋषभ शेट्टीनं दिली ट्विटद्वारे मोठी माहिती; प्रेक्षकांची प्रतिक्षा संपणार

Rishab Shetty Prequel Of Kantara : अभिनेता ऋषभ शेट्टीचे (Rishab Shetty) चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत. ऋषभ शेट्टीनं कांतारा (Kantara) चित्रपटाच्या प्रीक्वेलचं (Prequel Of Kantara) कथानक लिहायला सुरुवात केली आहे. कांतारा-2 (Kantara-2) या चित्रपटाबद्दल ऋषभनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना माहिती दिली.

होम्बले फिल्म्स या प्रोडक्शन हाऊसनं ट्विटर अकाऊंटवर एक ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये लिहिलं, “नवीन वर्षाच्या या शुभ मुहूर्तावर, आम्हाला हे कळवताना आनंद होत आहे की, कांताराच्या दुसऱ्या भागाचे लेखन सुरू झाले आहे. निसर्गाशी असलेले आमचे नाते दर्शवणारी आणखी एक आकर्षक कथा तुमच्यासमोर मांडण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. अधिक अद्यतनांसाठी संपर्कात रहा.”

ऋषभ शेट्टीनं कांतारा-2 बाबत लिहिलं, “कांताराच्या रायटिंगला सुरुवात” त्याच्या या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. अवघ्या 16 कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही हिट ठरला’. ‘कांतारा’ चित्रपटात अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेत दिसले. आता कांतारा-2 मध्ये कोणते कलाकार प्रमुख भूमिका साकारतील? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये