ताज्या बातम्यादेश - विदेश

युद्ध पेटलं! पॅलेस्टाईनकडून रॉकेट हल्ले अन् इस्त्रायलकडून युद्धाची घोषणा

Israel-Palestine War | इस्त्रायल (Israel) आणि पॅलस्टाईन (Palestine) आमने-सामने आले असून त्यांच्यात युद्ध (War) पेटलं आहे. पॅलेस्टाईनमधील हमास (Hamas) या दहशतवादी संघटनेनं इस्त्रायलवर 5000 अधिक रॉकेट डागले आहेत. त्यामुळे चवताळलेल्या इस्त्रायलनं देखील युद्धाची घोषणा केली आहे. इस्रायलने ‘ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स’ची घोषणा केली आहे. त्यामुळे इस्रायली हवाई दल पॅलेस्टाईनमधील गाझामधील लक्ष्यांवर बॉम्बफेक करत आहे.

मागील काही दिवसांपासून हमास दहशतवाद्यांकडून इस्त्रायलवर हल्ला आणि कारवाई केली जात असल्याचे दावे केले जात आहेत. तसंच शनिवारी सकाळी गाझा पट्ट्यातून किमान डझनभर रॉकेट इस्त्रायलमध्ये लाँच करण्यात आले. त्यानंतर हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा पट्टीतून घुसखोरी केली आहे. त्यामुळे इस्त्रायलनं युद्धाची घोषणा केली आहे.

इस्त्रायलमध्ये मोठ्या संख्येनं दहशतवादी शिरले आहेत. त्यामुळे इस्त्रायलकडून या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिलं जात आहे. तसंच गाझा पट्टीत हवाई हल्ले देखील करण्यात येत आहेत, अशी माहिती इस्त्रायल लष्कराकडून देण्यात आली आहे. तर इस्त्रायल सरकारनं आपल्या नागरिकांना घरात राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये